पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेसोबत जाण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचा अमित शहांनी असा केला वापर!

अमित शहा

शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी नागरिकत्व सुधारणा विधेयकावेळी खरपूस समाचार घेतला. नागरिकत्व सुधारणा विधेयक धार्मिक फुटीरतेला खतपाणी घालणारे असल्याची टीका काँग्रेसने केली होती. त्याला उत्तर देताना अमित शहा यांनी सांगितले की, काँग्रेस हा इतका धर्मनिरपेक्ष पक्ष आहे की एकीकडे तो केरळमध्ये मुस्लिम लीगसोबत आघाडी करू शकतो. तर दुसरीकडे महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करू शकतो. 

डेक्कन क्वीनच्या डब्यांत, डायनिंग कारमध्ये नव्या वर्षात मोठा बदल

नागरिकत्व सुधारणा विधेयक सोमवारी लोकसभेत मांडण्यात आले. रात्री उशीरापर्यंत या विधेयकावर चर्चा झाल्यावर ते ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर करण्यात आले. या विधेयकावर विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपाला अमित शहा यांनी सोमवारी रात्री उत्तर दिले. त्यावेळी अमित शहा म्हणाले, काँग्रेस हा असा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे की, महाराष्ट्रात तो शिवसेनेशी युती करतो आणि केरळमध्ये तो मुस्लिम लीगशी आघाडी करतो. 

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती

नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून अमित शहा यांचे अभिनंदन केले. या विधेयकाला मंजूर करण्यासाठी ज्या पक्षांनी आणि खासदारांनी पाठिंबा दिला त्या सर्वांचेही नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.