पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभेतील उपाध्यक्षपदावर शिवसेनेचा दावा

उद्धव ठाकरे, अमित शहा

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे लोकसभेत उपाध्यक्षपद देण्याची मागणी केल्याचे वृत्त आहे. शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत १८ जागांवर विजय मिळवलेला आहे. शिवसेना एनडीएती दुसरा सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जास्तीची मंत्रिपदे मागितली आहेत. त्यांनी एनडीए सरकारमध्ये सहभागी असलेल्या एकमेव खासदारास चांगले खाते देण्याच्या मागणीवर जोर दिला आहे. शिवसेनेला अवजड उद्योग खाते देण्यात आले आहे. 

महायुतीचं त्रांगडं: 'कमळा'वर लढण्यास खोतांचा होकार, जानकरांचा नकार

'इकॉनॉमिक टाइम्स'शी बोलताना शिवसेनेचे संसदीय दलाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारमधील उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांना म्हटले आहे की, एनडीएतील दुसरा सर्वांत मोठा पक्ष असल्याकारणाने शिवसेनेचा उपाध्यक्ष पदावर नैसर्गिक हक्क आहे. आमच्या विनंतीवर सकारात्मक पद्धतीने विचार केला जाईल, अशी आम्ही अपेक्षा करतो. विशेष म्हणजे, राज्यसभेत एनडीएतील दुसरा सर्वांत मोठ्या सहकारी पक्षाला काही महिन्यांपूर्वी उपसभापती पद देण्यात आले होते. 

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या विजयी खासदारांसह एकविरा देवीच्या दर्शनाला

केंद्रीय मंत्रिमंडळातील खाते वाटपाबद्दल राऊत म्हणाले की, भाजपला लोकसभेत स्वबळावर बहुमत मिळाल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. पण सहकारी पक्षांच्या ताकदीचाही सन्मान करणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकसभेत १८ आणि राज्यसभेत तीन सदस्य असणाऱ्या शिवसेनेला केवळ एक मंत्रिपद देणे त्यांच्या क्षमतेच्या हिशेबाने योग्य नाही. त्यामुळे शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळात अधिक आणि योग्य प्रतिनिधित्व दिले जावे आणि हे काम लवकर केले जाऊ शकते. शिवसेनेचे अरविंत सावंत यांना देण्यात आलेले अवजड खाते हे कमी महत्वाचे आहे. त्यामुळे आम्ही महत्वाचे खाते मागितले आहे. 

शिवसेनेला पुन्हा अवजड उद्योग खाते दिल्यावरून उद्धव ठाकरे नाराज

दरम्यान, बीजेडीकडून भर्तहारी महताब यांच्याजागी पिनाकी मिश्रा यांना लोकसभेतील बीजेडीचे लोकसभेतील संसदीय नेतेपदी नियुक्त करण्यात आले आहे. बीजेडीकडून महताब यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. याचदरम्यान शिवसेनेकडून उपाध्यक्षपदासाठी दावा करण्यात आला आहे.