पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंनी घेतले प्रभू श्रीरामांचे दर्शन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदिर परिसरात दाखल झाले (ANI)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी सकाळी विशेष विमानाने अयोध्येत दाखल झाले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर हेही त्यांच्याबरोबर उपस्थितीत होते. हॉटेलमधून उद्धव ठाकरे हे सेनेच्या १८ खासदारांसह राम मंदिराकडे रवाना झाले. तिथे त्यांनी श्रीरामांचे दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव यांनी पत्रकार परिषद घेतली

 

Updates:

- अयोध्यावासियांना दिलेला शब्द पाळला- उद्धव ठाकरे

- लवकरात लवकर राम मंदिर होईल याचा आम्हाला विश्वास- उद्धव ठाकरे

- राम मंदिरासाठी अध्यादेश हीच आमची इच्छा- उद्धव ठाकरे

- उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरु

- उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या सर्व खासदारांसह रामलल्लांचे दर्शन घेतले.

- राम मंदिर परिसरात उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांचे आगमन

- राम मंदिर परिसरात ढोल-ताशांचा गजर

 उद्धव ठाकरेंसह सर्व खासदार हॉटेलमधून राम मंदिराकडे रवाना

- राम मंदिरात शिवसेनेचे खासदार शपथ घेणार

- उद्धव ठाकरे हॉटेलकडे रवाना
- अयोध्या विमानतळावर उद्धव ठाकरे यांच्या विमानाचे आगमन

- विमानतळावर ठाकरे कुटुंबीयांचे स्वागत करण्यासाठी खासदार संजय राऊत, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थितीत
- शिवसेनेचे सर्व १८ खासदार आधीच अयोध्येत दाखल झाले आहेत