पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंची १६ जूनला १८ खासदारांसह पुन्हा अयोध्यावारी

उद्धव ठाकरे

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या १६ जूनला अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित खासदारही असणार आहेत. हे सर्व मिळून प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते अयोध्येत महंत नृत्य गोपालदास यांच्या जन्मोत्सवातही सहभागी होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधाही नोव्हेंबरमध्ये उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब अयोध्येचा दौरा केला होता.

बालाकोटसाठी वापरलेले आणखी बॉम्ब विकत घेण्यासाठी करार

लोकसभा निवडणुकीच्या आधी अयोध्या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शरयू नदीच्या किनाऱ्यावर आरती केली होती. त्यावेळी त्यांनी लवकरात लवकर अयोध्येत राम मंदिर उभारण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यावेळी औपचारिकपणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती जाहीर झाली नव्हती. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी युती केली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ उमेदवार विजयी ठरले आहेत. गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी सहकुटूंब कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळीही शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते.

'३५० खासदार आहेत, राम मंदिरसाठी आणखी काय हवंय?'

अयोध्येमध्ये उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राम मंदिर उभारण्याची मागणी सरकारकडे करू शकतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या मुद्द्यावर कानपूरमध्ये बोलताना न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्याचे मत व्यक्त केले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shiv Sena chief Uddhav Thackeray along with all 18 party MPs will visit Ayodhya on June 16