पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिकडे बॅ.जीना सुखी, इकडे महात्मा गांधी बदनामः संजय राऊत

महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जीना

शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी भाजप आणि खासदार अनंतकुमार हेगडे यांच्यावर निशाणा साधला आहे. गांधी इंग्रजांचे एजंट होते. गांधीजींचे स्वातंत्र्यासाठीचे आंदोलन प्रायोजित होते, असा आरोप अनंतकुमार हेगडे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रात लिहिलेल्या लेखात समाचार घेतला आहे. असे बोलणाऱ्या हेगडेंनी पाकिस्तानमधील अराजकता पाहिली पाहिजे. तिथे बॅरिस्टर जीना सुखात तर इकडे महात्मा गांधी बदनाम असे सुरु असल्याची टीका त्यांनी केली. 

वारकऱ्यांचाही भगवा आहे आणि छत्रपतींचाही भगवाच होता!- शर्मिला ठाकरे

संजय राऊत यांनी आपल्या लेखात पुढे म्हटले की, महात्मा गांधी यांची आणखी किती वेळा हत्या करणार आहोत? हे आता आपणच ठरवायला हवे. गांधी विचारांशी जे सहमत नाहीत त्यांनाही हे मान्य करावेच लागेल की गांधीजींच्या तोडीचा नेता स्वातंत्र्य चळवळीत झाला नाही. गांधींचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान मोठेच होते हे मान्य करून नथुराम गोडसे याने आधी गांधींच्या पायाला स्पर्श केला व नंतर गांधींवर गोळ्या झाडल्या. गोडसेच्या प्रेमींनी गांधींवर असभ्य टीका करताना गोडसेची सभ्यताही स्वीकारायला हवी. कर्नाटकातील भाजपचे नेते अनंतकुमार हेगडे यांनी जाहीर केले की, ‘गांधीजी हे ब्रिटिशांचे एजंट होते व त्यांची स्वातंत्र्य चळवळ भाडोत्री होती.’ हे विधान अस्वस्थ करणारे आहे. भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनीही मधल्या काळात गांधींवर थुंकण्याचा प्रकार केला व गोडसे त्यांचा आदर्श असल्याचे सांगितले. पण हेगडे आणि साध्वी प्रज्ञा यांची गांधीजींविषयीची मते वैयक्तिक असल्याचे भाजपकडून जाहीर केले. हिंदुस्थानात गांधी जन्मास आले त्याची मोठी किंमत ते हत्येनंतर ७० वर्षांनीही चुकवत आहेत.

पुन्हा भाजप सरकार आणल्याशिवाय दिल्लीवारी नाहीः फडणवीस

अखंड भारत निर्माण करण्याचे साहस कुणात?
गांधींना समजून घेणे हेगडेसारख्यांना शक्य नाही. हिंदुत्वाचा विचार सगळ्यांनाच मान्य आहे. पण तालिबानी पद्धतीचे हिंदुत्व देशाचा अफगाणिस्तान करील. गोडसेला श्रद्धांजली वाहण्यासाठी गांधींना शिव्या घालण्याची गरज नाही. गांधी प्रतिमेवर गोळ्या झाडून विकृत आनंद मिळवायची आवश्यकता नाही. गांधींमुळे पाकिस्तान झाला, देशाची फाळणी झाली असे ज्यांना वाटते त्यांनी पक्षाच्या बैठकीत मोदी व शहांना सांगायला हवे की, तोडलेला पाकिस्तान परत जिंकून घ्या. अखंड भारताचे स्वप्न साकार करा व त्या अखंड भारताचे प्रतीक म्हणून लाहोर, कराची, इस्लामाबादेत वीर सावरकरांचा पुतळा इतक्या उंचीचा उभा करा की, जगाचे डोळे दिपतील. गोडसे याने अखंड भारताच्या ध्यासापायी गांधींवर गोळ्या झाडल्या तो अखंड भारत निर्माण करा. हे करण्याचे साहस कुणात आहे काय?, असा सवाल राऊत यांनी विचारला. 

गांधींची यथेच्छ बदनामी करणे, त्यांच्या हेतूवर शंका घेणे, चारित्र्यावर चिखलफेक करणे, त्यांचे पुतळे पाडणे, पुतळ्यांवर गोळ्या झाडणे हे पाप आहे. पण हेगडे व प्रज्ञा यांना असे पाप करण्याचे स्वातंत्र्य व अधिकार गांधींमुळे प्राप्त झाले हे लक्षात घेतले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. 

CAA: प्रवाशाला पोलिसांच्या हवाली करणाऱ्या कॅबचालकाचा भाजपकडून गौरव

पाकिस्तानचा 'नरक' बनला आहे
गांधींच्या जीवनाचे सार व कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य त्यांच्या ‘अहिंसे’त आहे; परंतु खेदाची गोष्ट अशी की, हिंदी जनता खऱ्या अर्थाने अहिंसाभक्त बिलकूल बनली नाही. स्वराज्याच्या पहिल्या वर्षात लाखो लोकांची हत्या आणि वाताहत झालेली आपण निमूटपणे पाहिली व अहिंसेचे मुख्य सेवक गांधीजी यांचाही खून या देशात झाला. गांधीजींएवढी असामान्य व्यक्ती या देशात होऊन गेली, परंतु त्यांच्या गुणांचे चीज आपण पुरेसे करू शकलो नाही. 

...तर आम्ही राहुल गांधींना अंडे फेकून मारुः रामदास आठवले

गांधींमुळे देश तुटला असे ज्यांना वाटते त्यांनी तो पुन्हा अखंड करावा. तसे करण्यापासून त्यांना कोणीच रोखलेले नाही. तिकडे पाकिस्तानात बॅ. जीना कबरीत शांतपणे विसावले आहेत. पाकिस्तानचा साफ ‘नरक’ बनला, पण त्याचा दोष कोणी बॅ. जीनांच्या माथी मारत नाहीत. पण गांधी-नेहरूंनी एक आधुनिक भारत निर्माण केला. त्यांना रोज मारले जात आहे. हेसुद्धा एक स्वातंत्र्यच आहे. भारताची अवस्था पाकिस्तानसारखी झाली नाही याचे श्रेय गांधी, नेहरू व पटेलांसारख्या काँग्रेस नेत्यांकडे जाते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shiv Sena attack on BJP in his mouthpiece saamana said Jinnah is happy Gandhi is infamous here