पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून काँग्रेस नेता शत्रुघ्न सिन्हांनी केला PM मोदींना सलाम

शत्रूघ्न सिन्हा आणि नरेंद्र मोदी

भाजपची साथ सोडून काँग्रेसच्या गोटात सामील झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलाम केलाय. भाजप सरकारची धोरणे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मोदींवर त्यांनी अनेकदा टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलेल्या भारतवासियांना  मायदेशी आणल्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटच्या माध्यमातून मोदींचे आभार मानले आहेत. 

'आप' कल्याणकारी योजनेतील अडथळा, PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा

चीनमधील वुहान शहरातील भारतीय विद्यार्थ्यांना तात्काळ हालचाली करुन मायदेशी आणण्याचा सरकारचा निर्णय कौतुकास्पद आहे. मोदीजी, अमित शहा यांच्यासह एअर इंडिया कंपनीच्या क्रू मेंबर्संना मी सलाम करतो, अशा आशयाचे ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे.  राजकारण आणि निवडणुका  बाजूला ठेऊन माणूसकीच्या दृष्टिने सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. बिकट परिस्थितीत अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने केलेली मदत कौतुकास्पद आहे, असाही उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. 

बलात्काराच्या प्रकरणात स्वामी चिन्मयानंद यांना हायकोर्टाकडून जामीन

लोकसभा निवडणुकीपूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले होते. भाजपमध्ये असताना देखील त्यांनी अनेकदा मोदी-शहांच्या विरोधात वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र राजकीय मतभेद बाजूला ठेवत शत्रुघ्न सिन्हा यांनी सरकारच्या निर्णयाचं कौतुक केले आहे.  चीनमधील वुहान हे कोरोनाचं केंद्रबिंदू आहे. वुहान आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक अडकले होते, त्यांना परत आणण्यासाठी भारतानं मोहीम राबवली आहे. वुहान प्रांतातून भारतीयांना विशेष विमानानं मायदेशात आणण्यात आले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shatrughan Sinha tweets on PM Modi for evacuation of students from coronavirus affected Wuhan China