पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोशल डिस्टन्सिंगसाठी दुकानदाराचा 'केरळ पॅटर्न', भन्नाट आयडिया

या ट्विटसोबत त्यांनी त्या दुकानाचा एक फोटोही शेअर केला आहे.

दोन व्यक्तींमधील सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्सिंग) हेच सध्या कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याचे प्रभावी अस्त्र आहे. सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. पण जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी काही नागरिकांना घराबाहेर पडावे लागते आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंग हेच पाळले पाहिजे. केरळमधील एका दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंग अंमलात आणण्यासाठी एक भारी शक्कल लढविली आहे. त्याच्या या अभिनव गोष्टीकडे सगळ्यांचे लक्ष गेले. विशेष म्हणजे काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनीही या वेगळेपणाबद्दल ट्विट केले आहे.

वाशीत कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाचा मृत्यू

शशी थरूर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दुकानदार आणि ग्राहक यांच्यातही सोशल डिस्टन्सिंग राखणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सिंगचा हा केरळ पॅटर्न आहे.

या ट्विटसोबत त्यांनी त्या दुकानाचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये दुकानदाराने ग्राहकांना वस्तू देण्यासाठी समोरील भागात एक मोठा पाईप बसवला आहे. ग्राहकाला हव्या असलेल्या वस्तू त्याला या पाईपमधून दिल्या जातात. 

चीनमध्ये परिस्थिती पूर्वपदावर, कार उत्पादक कारखाने सुरू

शशी थरूर यांनी हे ट्विट केल्यानंतर त्याला १८००० लाईक्स आले आहेत. त्याचबरोबर २८०० लोकांनी ते रिट्विट केले आहे. अनेकांना या दुकानदाराची ही आयडिया आवडली आहे.