पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'CAA संदर्भातील विरोध कमी होईल, पण मोदी-शहांना हे जमणार आहे का?'

शशी थरुर

सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे उठलेले वादंग नियंत्रणात ठवणे शक्य होते. पण त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खुलेपणाने काही भूमिका घेण्याची गरज होती, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी व्यक्त केले आहे. केरळमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. थरुर म्हणाले की, जर  मोदी आणि शहांनी मनात आणलं असतं तर सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भातील विरोध कमी होऊ शकला असता. पण राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी यामाध्यमातून त्यांना भारतीय लोकांची ओळख परेडच घ्यायची आहे.

CAA वर अर्थमंत्री म्हणाल्या, सामी अन् तस्लिमा यांना नागरिकत्व दिले

अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी- शहांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनसीआर) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे मुद्दे बाजूला ठेवावेत. घराघरात जाऊन लोकांना तुमच्या आई-वडीलांचा जन्म कोठे झाला हे विचारु नये. तसेच त्यांच्याकडे देशाचे नागरिकत्वाबाबत पुरावा मागू नये. त्यांनी एनआरसी आणि एनपीआरसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली तर सुधारित नागरिकत्व कायद्याला होणार विरोध सहज नियंत्रणात येईल. पण ते अशी भूमिका घ्यायला तयार नाहीत. यावरुनच त्यांना नागरिकांची ओळख परेड घेण्याचा इरादा स्पष्ट  दिसून येतो, अशा शब्दांत थरुर यांनी मोदी-शहांवर तोफ डागली.  

प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर भेट, तासभर चर्चा

केंद्र सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा लागू केला असला तरी अद्यापही या कायद्याच्या विरोधात विविध ठिकाणी विरोध सुरुच आहे. भाजप आपल्या मुद्यावर ठाम असून या कायद्यासंदर्भात जनजागृतीसाठी त्यांच्याकडून जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे. दुसरीकडे विरोधकांकडून हा कायदा देशात फूट पाडण्याचे डाव असल्याची टीका होत आहे.