पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कन्हैयाकुमारपेक्षा शरजील इमाम खतरनाकः अमित शहा

अमित शहा

शरजील इमामचे बोलणे कन्हैयाकुमारपेक्षा जास्त धोकादायक आहे. आता तो तुरुंगाची हवा खाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडमधील रायपूर येथे केले. ते म्हणाले,' शरजीलचा व्हिडिओ पाहा, त्याचे भाषण ऐका. त्याने कन्हैयाकुमारपेक्षा खतरनाक वक्तव्ये केली आहेत. आज दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आता त्याला दिल्लीला आणले जात आहे.'

चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करणार

अमित शहा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. लहानपणापासून आजपर्यंत मी नेहमी पक्ष संघटना, पक्षाचा निर्णय, पक्षाचे सिद्धांत, पक्षाच्या कार्यपद्धतीला समजून घेणे आणि त्यानुसार जगण्याचा प्रयत्न केला आहे. मी खूप कमी वयात भाजपचा कार्यकर्ता बनलो. मी एकच गोष्ट शिकलो की, भाजप सर्व राजकीय पक्षांपेक्षा एकमेव असा पक्ष आहे जो विचारधारेसाठी राजकारणात आला आहे, असे शहा म्हणाले. 

'PM मोदींशी चर्चा करायला तयार, CAAला आधी मागे घ्या'

देशातील कोट्यवधी कार्यकर्त्यांचे लक्ष्य होते की, देशाचा मुकूटमणी काश्मीर या देशाचा अभिन्न हिस्सा व्हावा. मोदीजींना पुन्हा बहुमत मिळाले. त्यांनी ५ ऑगस्ट २०१९ ला वेळ न दवडता कलम ३७० आणि ३५ अ हटवले. आज देशाची जी दिशाभूल करत आहेत, मी त्यांना सांगू इच्छितो की, असत्याला कधी पाय नसतात आणि असत्यचे आयुष्य दिर्घ नसते. कितीही जोर लावला तरी अखेर विजय सत्याचाच होतो. 

'९ फेब्रुवारीचा मोर्चा CAA आणि NRCच्या समर्थनार्थ नाही'