पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशविरोधी भाषण करणाऱ्या शरजीलला बिहारमधून अटक

शरजील इमाम

देशविरोधी भाषण प्रकरणातील आरोपी शरजील इमामला दिल्ली पोलिसांनी मंगळवारी बिहारमधील जहानाबाद येथून अटक केली आहे. इमामवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मीडियावर शरजीलचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत तो आसामबाबत प्रक्षोभक भाषण करताना दिसत होता. 

शरजीलला अटक करण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले होते. मंगळवारी सकाळी सुमारे चार वाजता केंद्रीय तपास पथक काको येथील मल्लिक टोला येथे गेले होते. शरजील इमामच्या घराची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली होती. याचदरम्यान पोलिसांनी शरजीलचा छोटा भाऊ मुझम्मिल इमाम आणि त्याचा मित्र मोहम्मद इमरानला आपल्याबरोबर नेले.  

दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ ते ८ च्या सुमारास शरजील बिहारमधील फुलवारी शरीफ येथे एका बैठकीत दिसला होता असा दावा दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केला होता. 

सोमवारी शरजीलचे काका अरशद इमाम यांनी म्हटले होते की, 'आम्ही कायद्याचे पालन करु. आमच्याकडून कायद्याचा सन्मान केला जाईल. लवकरच सर्व सत्य समोर येईल.' तर शरजीलची आई अफसान रहीम यांनी आपला मुलगा निर्दोष असल्याचे म्हटले होते.