पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA विरोधात रस्त्यावर उरतलेल्या ममता बॅनर्जींना शरद पवारांचा पाठिंबा

शरद पवार

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. २३ डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांना पत्र लिहून सीएए आणि एनआरसीविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची मागणी केली होती. शरद पवार यांनी २७ डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले.

'देश तोडण्याचं इंग्रजांचं अर्धवट काम भाजप पूर्ण करतंय'

शरद पवार यांनी या पत्रात असे म्हटले आहे की, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात तुम्ही सुरु केलेल्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. संविधान वाचविण्यासाठी जी लढाई सुरु केली आहे. त्याचा मी एक भाग आहे याचा मला आनंद आहे. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. कृपया मला यासंदर्भातील कोणत्याही बैठकीबाबत किंवा घेतलेल्या निर्णयाबाबत जरूर कळवा, असे पवारांनी सांगितले आहे. 

शपथविधीनंतर काँग्रेसच्या मंत्र्यांनी घेतली राहुल गांधींची भेट

ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन सुरु केले आहे. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला खडसावून सांगतिले आहे की, कुठल्याही परिस्थितीमध्ये सीएए आणि एनआरसी पश्चिम बंगालमध्ये लागू करुन देणआर नाही. ममता बॅनर्जी आपल्या कार्यकर्त्यांसह या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. दरम्यान, भाजपने देखील पश्चिम बंगालमध्ये या कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढली आहे. 

खरेदीदार न मिळाल्यास ६ महिन्यात एअर इंडिया बंद होणार ?

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sharad pawar writes letter to mamata banerjee extending his support to protest against caa and ncr