महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत पक्षाची भूमिका ठरवण्यास आणखी एक ते दोन दिवस लागण्याची शक्यता काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सिंग सुरजेवाला यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती कथन केल्याचे त्यांनी सांगितले.
Sh. Sharad Pawar met the Congress President today and briefed her on the situation in Maharashtra. It was decided that in a day or two, representatives from NCP & Congress will meet in Delhi to discuss the way forward
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) November 18, 2019
शेतकऱ्यांवर इतके प्रेम होते तर सरकार का नाही बनवले? - नवनीत कौर
शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर सुरजेवाला यांनी टि्वट करुन ही माहिती दिली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते लवकरच पुन्हा भेटतील आणि येत्या एक ते दोन दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले.
राष्ट्रवादीकडून थोडं शिका, मोदींनी राज्यसभेत केलं कौतुक
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार सोमवारी दुसऱ्यांदा सोनिया गांधी यांच्या भेटीला गेले होते. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढ्यासंदर्भात चर्चा अपेक्षित होती. त्यामुळे ही भेट राज्यातील सत्तास्थापनेच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.