पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Covid-19 टेस्ट किट भ्रष्टाचारावर राहुल गांधी म्हणाले, मोदीजी कारवाई करा!

राहुल गांधी

कोरोना विषाणूविरोधातील लढ्यातील ढाल म्हणून उपयुक्त ठरत असलेल्या कोविड टेस्टिंग किटमधील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केलाय. इंडियन कौन्सिल ऑफ इंडिया (आयसीएमआर) ला महागड्या दराने टेस्टिंग किटची विक्री करण्यात आल्याचे समोर येत आहे. या मुद्यावरुन राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.  

'कोरोनाविरोधात लढत असताना अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही'

चीनमधून आयात करण्यात येत असलेल्या कोविड १९ रॅपिड टेस्ट किटच्या माध्यमातील खरेदी-विक्रीतील वाद हा सर्वोच्च न्यायालयात पोहचल्यानंतर यासंदर्भातील दराचा खुलासा झाला आहे. देश संकटात असताना काहीजण फायदाचा विचार करत आहेत. ही गोष्ट लाजिरवाणी असून जी लोक संकटाच्या काळात फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.

कोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं

संपूर्ण देश कोरोना विषाणूने निर्माण झालेल्याय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करत आहे. या परिस्थितीतही काही लोक आपला फायदा पाहत आहेत. या भ्रष्ट मानसिकता लाजिरवाणी अशी आहे. देशवासिया या लोकांना कधीच माफ करणार नाहीत, असा उल्लेख राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय.
चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या रॅपिड टेस्ट किटची किंमत २२४  रुपये इतकी आहे. मात्र आयात करणारी मंडळी हे किट आयसीएमआरला तब्बल ६०० रुपयांन विकत आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचल्यानंतर न्यायालयाने किट  ४०० रुपयांनी विक्री करण्याचे आदेश दिले आहेत.