पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : शाहीन बागमध्ये पोलिसांची कारवाई, आंदोलकांना हटविले

शाहीन बाग

सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बागमध्ये गेल्या १०० दिवसांहून अधिक काळ सुरु असलेलं आंदोलन अखेर हटविण्यात आलं आहे. मंगळवारी सकाळी आंदोलन  स्थळ पोलिसांनी कारवाई करत खाली केलं आहे. आंदोलनकर्त्यांनी लावलेले तंबूही  हटविण्यात आले आहेत . दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. यामुळे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास परवानगी नाही. कोरोना विषाणूचं एका शरीरातून दुसऱ्या  शरीरात संक्रमण सहज शक्य आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी लोकांना गर्दी न करण्याचं आवाहान केलं जात आहे. 

राज्यातील पहिल्या कोरोनाबाधित पुणेरी जोडप्याविषयी दिलासादायक बातमी

खबरदारी म्हणून राजधानी दिल्लीत लॉकडाऊन घोषणा करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव वाढू नये यासाठी लोकांना घरीच बसण्याचं आवाहन वारंवार करण्यात येत आहे.  'लॉकडाऊन असल्यानं इथल्या आंदोलकांना आंदोलन स्थळावरुन घरी परतण्याची विनंती करण्यात आली  होती. पण काहींनी स्थळावरुन हलण्यास नकार दिला, त्यामुळे नियमाचं उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात आली. आता संपूर्ण आंदोलन स्थळ खाली करण्यात आलं आहे तर काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं  आहे, अशी माहिती दक्षिण दिल्लीच्या डीसीपींनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.  

कोणीही नोकरी गमावणार नाही याचीही खबरदारी घ्या!

या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.