पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तब्बल ७० दिवसांनी शाहिन बागमधील एक रस्ता खुला झाला, पण...

शाहिन बाग येथील आंदोलनकर्त्यांनी परिसरातील ९ क्रमांकाचा रस्ता खुला केला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शाहिन बाग परिसरातील रस्ता क्रमांक ९ तब्बल ७० दिवसानंतर खुला करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांनी कालिंदी कुंज ते नोएडाच्या दिशेने जाणारा २०० मीटर रस्ता मोकळा केला आहे. नोएडाकडून दिल्लीच्या दिशेला जाणारा रस्ता अद्यापही बंदच आहे. जो रस्ता रस्ता खुला करण्यात आला आहे तो शाहिन बाग, जामिया, अबू फजल यांना जोडणारा असल्यामुळे नोएडाच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मात्र कायम राहणार आहे.  

'ते वक्तव्य हिंदू बांधवासाठी नव्हे तर RSS-BJP वाल्यांसाठी'

दक्षिण पूर्व दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनकर्त्यांनी रस्ता क्रमांक ९ खुला केल्यानंतर दुसऱ्या एका गटाने हा रस्ता पुन्हा बंद केला. त्यानंतर पुन्हा रस्ता मोकळा करण्यात आला. त्यामुळे रस्ता खुला करण्यात आंदोलनकर्त्यांमध्ये एकमत आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. शाहिन बाग येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी काही प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे.

निर्भया प्रकरणः दोषी विनयचा आणखी एक डाव फसला, कोर्टाने याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिनिधी आणि आंदोलनकर्ते यांच्यात चौथ्या दिवशीही कोणतीही सकारात्मक चर्चा झालेली नाही. ज्येष्ठ वकील साधना रामचंद्रन या शनिवारी एकट्याच आंदोलनकर्त्यांशी चर्चा करायला आल्या होत्या. मात्र आंदोलनकर्त्यांचा सुधारित नागरिकत्वाच्या विरोधातील सूर कायम असून आंदोलनावर ते ठाम असल्याचे दिसून आले.  आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यासाठी याठिकाणी आले नसून आंदोलनकर्त्यांनी रस्ता खुला करावा ही विनंती करण्यासाठी याठिकाणी आल्याची प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थीसाठी नियुक्त केलेल्या वकील रामचंद्रन यांनी दिली होती.