पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लैंगिक शोषणाचा आरोप : 'सर्व पुरावे देऊनही मला न्याय मिळालाच नाही'

सरन्यायाधीश रंजन गोगोई

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक शोषणाच्या आरोपातून क्लीन चिट मिळाल्यानंतर तक्रारदार महिलेने तीव्र नाराजी व्यक्त केली. रंजन गोगोई यांच्याविरुद्ध सर्व पुरावे सादर करूनही मला न्याय मिळालाच नाही, अशी खंत तिने व्यक्त केली. त्याचबरोबर आपण वकिलांशी सल्लामसलत करून पुढील निर्णय घेऊ असेही तिने स्पष्ट केले.

रंजन गोगोई यांच्याविरोधात करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तीन सदस्यीय अंतर्गत चौकशी समितीने सोमवारी त्यांना क्लीन चिट दिली. न्या. शरद बोबडे हे या समितीचे अध्यक्ष होते. तर समितीमध्ये न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. इंदू मल्होत्रा यांचा समावेश होता. समितीच्या प्राथमिक अहवालानंतर तक्रारदार महिलेने एक निवदेन प्रसिद्ध करून आपली नाराजी व्यक्त केली. 

लैंगिक शोषणाचे आरोप; सरन्यायाधीश गोगोई यांना क्लीन चिट

माझ्यासोबत अन्याय झाला आहे. समितीसमोर सर्व पुरावे सादर करूनही मला न्याय देण्यात आला नाही. मी आणि माझ्या परिवाराने जी अवहेलना सहन केली. त्यावरही काही उपाय मिळाला नाही. हे सर्व बघून अत्यंत खेद वाटतो, असे या निवेदनात म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या २२ न्यायाधीशांना पाठविलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये संबंधित महिलेने तिच्यावरील अन्यायाला वाचा फोडली होती. केवळ मलाच नोकरीतून निलंबित करण्यात आले असे नाही तर माझे पती आणि दिरांनाही दिल्ली पोलिसांच्या सेवेतून काढून टाकण्यात आले. मला जी भीती वाटत होती. ती अखेर खरी ठरली आहे. न्याय मिळण्याची जी आशा होती ती सुद्धा संपुष्टात आली आहे, असे या महिलेने म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sexual harassment charges against the Chief Justice of India Ranjan Gogoi Worst fears have come true says complainant