पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सात दहशतवादी नेपाळमार्गे भारतात घुसण्याच्या तयारीत

सात दहशतवादी नेपाळमार्गे भारतात घुसण्याच्या तयारीत

काश्मीरमुळे चवताळलेला पाकिस्तान भारताविरोधात कट रचत असल्याचे समोर आले आहे. नेपाळमार्गे सात संशयित पाकिस्तानींच्या प्रवेशामुळे नेपाळ पोलिस आणि सुरक्षा दले दक्ष झाले आहेत. वीरगंजमध्ये या संशयित व्यक्ती दिसल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी विविध ठिकाणी छापे मारले जात आहेत. परंतु, सुरक्षा दलांना अद्याप यश मिळालेले नाही. गुप्तचर संस्थांनुसार, हे दहशतवादी भारत-नेपाळमधील खुल्या सीमेतून भारतात घुसून मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.

भारत-पाकदरम्यान तणाव घटला, मदतीसाठी मी तयारः डोनाल्ड ट्रम्प

गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काठमांडूमधील त्रिभुवन विमानतळावर सात पाकिस्तानी नागरिक संशयित हालचालींमुळे सुरक्षा संस्थांच्या दृष्टीस पडले होते. काठमांडूमध्ये ते काही दिवस अनेक लोकांच्या संपर्कात होते. पण वीरगंजमध्ये दोन दिवसांपूर्वी एका मंदिराजवळ हे लोक दिसल्यानंतर नेपाळी गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या. या संशयित पाकिस्तानींनी काही लोकांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी बैठकाही घेतल्याचे समजते.

जेव्हा या संशयितांना त्यांच्यावर नजर ठेवली जात असल्याचे लक्षात आले. तेव्हा ते सर्वजण भूमिगत झाले. दरम्यान, नेपाळ सुरक्षा विभागाला या सर्व सात जणांचे नावे आणि त्यांचे पासपोर्ट नंबर मिळाले आहेत. इतकेच नव्हे तर आठवड्याभरातील त्यांच्या सर्व हालचालींची नोंदही उपलब्ध आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनुसार, भारतात दहशतवाद्यांचे जे स्लीपर सेल काम करत आहेत. त्यांनी एका मोठ्या हल्ल्याला मुर्त स्वरुप देण्यासाठी रेकीही केली आहे.

भाजप नेत्याने टोल कर्मचाऱ्याला केली मारहाण

कलम ३७० हटवल्यानंतर आयएसआय अधिकाऱ्यांची तीळपापड
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय बिथरली आहे.