पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काबूल बॉम्बस्फोटाने हादरले; ७ जण ठार

अफगाणिस्तान बॉम्बस्फोट

अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहर बॉम्बस्फोटाने हादरले आहे. काबूलच्या कसाबा भागामध्ये कारमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही. पोलिसांकडून तपास सुरु आहे.

..तर तो आमदार पुन्हा निवडून येणार नाही, अजित पवारांचे प्रत्युत्तर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काबूल शहराच्या पीडी १५ मधील कसाबा भागामध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी सव्वासातच्या सुमारास बॉम्बस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटामुळे या परिसरातील वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. बॉम्बस्फोटात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या ७ जणांवर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

..म्हणून अजित पवारांनी मागितली माफी

यापूर्वी, अफगाणिस्तानच्या पूर्व भागामध्ये १८ ऑक्टोबर रोजी मशिदीमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. या बॉम्बस्फोटामध्ये ६२ जणांचा मृत्यू झाला होता. तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. नमाज पठण करण्यासाठी मशिदीमध्ये सर्वजण उपस्थित होते त्याचवेळी हा बॉम्बस्फोट घडवून आणला होता. 

मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीसांची नवी ओळख महाराष्ट्राचा