पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कामकाजात अडथळा आणल्याबद्दल काँग्रेसचे सात सदस्य लोकसभेतून निलंबित

लोकसभा

अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या सात सदस्यांना निलंबित केले आहे. यामध्ये गौरव गोगोई, टीएन प्रतापन, मणिक्कम टागोर, गुरजित सिंग औजला, बेनी बेहनन, राजमोहन उन्नीथन आणि ऍड. डीन कुरियाकोस यांचा समावेश आहे. या सदस्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने कागद भिरकावल्याचा आरोप आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबन करण्यात आले आहे.

निर्भया प्रकरण : चारही दोषींना २० मार्चला पहाटे फासावर लटकवण्याचे आदेश

या सात सदस्यांना निलंबित करण्याचा ठराव लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३.०३ मिनिटांनी सभागृहाचे कामकाज शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

दिल्ली हिंसाचारावर तातडीने चर्चा करण्याची मागणी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून केला जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला सोमवारी सुरुवात झाली. तेव्हापासून विरोधक या मुद्द्यावरून घोषणाबाजी करीत असल्यामुळे सभागृहाचे कामकाज सातत्याने तहकूब करावे लागत आहे. 

दिल्ली हिंसाचार : ताहिर हुसैन म्हणतो, मी शरण येण्यास तयार

दिल्ली हिंसाचारावर सरकार चर्चा करण्यास तयार आहे. त्यासाठी लोकसभेत ११ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तर राज्यसभेत १२ मार्च निश्चित करण्यात आली आहे, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले. त्यानंतरही विरोधक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी सर्व नियोजित कामकाज बाजूला ठेवून याच विषयावर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली. त्यावरून लोकसभेत गदारोळ झाला.