पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्या प्रकरण : मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांची हकालपट्टी

राजीव धवन

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणात सुन्नी वक्फ बोर्ड आणि इतर मुस्लिम पक्षकारांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणारे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांची या खटल्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुस्लिम पक्षकारांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत आता मुस्लिम पक्षकारांची बाजू राजीव धवन मांडणार नाहीत.

धक्कादायक, पुण्यात सिंहगड रस्त्यावर आढळला तरुणीचा मृतदेह

राजीव धवन यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणारे ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड एजाज मकबूल यांनी मला या खटल्यातून बाहेर काढण्यात आले असल्याचे कळविले आहे. मी लगेचच त्यांचा निर्णय मान्य असल्याचे पत्र लिहून सांगितले. यापुढे या खटल्याशी माझा काहीही संबंध असणार नाही, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

आपली प्रकृती सध्या ठिक नसल्यामुळे आपल्याला या खटल्यातून काढून टाकण्यात आल्याचे मला कळविण्यात आले, अशी माहिती खुद्द राजीव धवन यांनी एएनआयला दिली.

'... म्हणून मी मध्य प्रदेशातील भाजप सरकारविरोधात बोलत नव्हते'

दरम्यान, बाबरी मशिद पुन्हा बांधण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालय केंद्र आणि राज्य सरकारला देत नाही, तोपर्यंत आम्हाला न्याय मिळाला, असे वाटणार नाही, असे एक याचिकाकर्ते मौलाना सयद अशद राशिदी यांनी म्हटले आहे. त्यांनीही या प्रकरणात फेरविचार याचिका दाखल केली आहे.