पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा मुलाने केला भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा मुलगा भाजपच्या वाटेवर

दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असताना काँग्रेसला मोठा धक्का देणारे वृत्त समोर येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांचे चिरंजीव समीर द्विवेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जनार्दन द्विवेदी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. पण समीर यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. समीर यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

'महात्मा गांधींबद्दल अवमानकारक बोलणारे रावणाची औलाद'

जनार्दन द्विवेदी हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यापैंकी एक आहेत. सोनिया गांधींचे ते निकटवर्तीय मानले जायचे. मात्र सध्याच्या घडीला काँग्रेसमधील त्यांचे स्थान पूर्वीसारखे राहिलेले नाही. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या जनार्दन द्विवेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्यापासून पक्षातील त्यांचे महत्त्व कमी झाल्याचे पाहायला मिळाले.

पेन्शनरांसाठी मोठा निर्णय, घरातूनच देता येणार हयातीचा दाखला

आपल्या एका मुलाखतीत त्यांनी मोदी हे भारतीयांच्या जवळचे नेते बनले असून मोदींचा विजय हा भारतीयांचा विजय आहे, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर निर्माण झालेली दरी आता आणखी वाढण्याचे संकेतच समीर द्विवेदी यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्तानंतर निर्माण झाली आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Senior Congress leader Janardan Dwivedi say on his son Samir joining BJP If he is joining BJP then it is his independent decision