पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुलाम नबी आझाद यांना पुन्हा रोखले; जम्मूवरुन दिल्लीला परत पाठवले

गुलाम नबी आझाद

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांना पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये जात असताना अडवण्यात आले आहे. आज दुपारी गुलाम नबी आझाद हे जम्मू विमानतळावर दाखल झाले. मात्र त्यांना विमानतळावरच अडवून परत दिल्लीला पाठवण्यात आले. दरम्यान, यापूर्वी ८ ऑगस्ट रोजी गुलाम नबी आझाद यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आले होते.

चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला

मिळालेल्या माहितीनुसार, गुलाम नबी आझाद आज दुपारी दीड वाजता दिल्लीवरुन जम्मू-काश्मीरला रवाना झाले. जम्मू विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना प्रशासनाच्या निर्देशानंतर ३ च्या दरम्यान विमातळावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना दिल्लीला पुन्हा पाठवण्यात आले. यावेळी त्यांना जम्मू-काश्मीरमधील घरी तसंच जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसच्या कार्यालयातील बैठकीला उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आली. 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 'अमृत' संस्थेची स्थापना होणार

दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, लोकशाहीसाठी हे योग्य नाही. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला तिथे जाण्यापासून रोखले जाते. मग तिथे कोण जाणार? आधीच जम्मू-काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तर जम्मू-काश्मीरच्या एका माजी मुख्यमंत्र्याला राज्यात प्रवेश करण्याची परवानगी नाही, हे असहिष्णुतेचे लक्षण आहे.' असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

श्रीसंतला मोठा दिलासा, आजीवन बंदी रद्द करून ७ वर्षे केली