पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नामवंताविरोधातील देशद्रोहाचा गुन्हा अखेर मागे

एकूण ४९ सेलिब्रिटींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

झुंडबळीविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांच्याकडे या विषयात लक्ष घालण्याची मागणी केल्यावरून देशातील ४९ नामवंताविरोधात दाखल करण्यात आलेला देशद्रोहाचा गुन्हा अखेर मागे घेण्यात आला आहे. या नामवंत व्यक्तींविरोधात बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे अनेकांनी त्यावर टीका केली होती. 

शिंदेंपेक्षा राष्ट्रवादी मला अधिक कळते: शरद पवार

मुझफ्फरपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनोज कुमार सिन्हा म्हणाले, या संदर्भातील प्रकरण बंद करण्याचे आदेश मी दिले आहेत. या नामवंत व्यक्तींविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा चुकीच्या मुद्द्यांवर आधारित होता. त्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नव्हते. त्यामुळे हे प्रकरण बंद करण्यास मी सांगितले आहे. 

गेल्या आठवड्यात मुझफ्फरपूरमधील सदर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेच्या आधारावर पोलिसांना कार्यवाही करण्यास सांगितले होते. वकील सुधीरकुमार ओझा यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यामध्ये रामचंद्र गुहा, अपर्णा सेन, श्याम बेनेगल आणि इतरांविरोधात आरोप करण्यात आले होते.

काँग्रेसला आत्मचिंतनाची गरजः ज्योतिरादित्य शिंदे

या प्रकरणी चुकीची याचिका दाखल केल्याबद्दल सुधीरकुमार ओझा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.