पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्येला पोलिस छावणीचे स्वरुप, घरातून बाहेर न पडण्याचे रहिवाशांना निर्देश

अयोध्येतील स्थिती (फोटो - पीटीआय)

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाचा निकाल थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालय देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीपासून अयोध्या शहराला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे. अयोध्येतील सर्व सार्वजनिक व्यवहार शनिवारी बंद ठेवण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. शनिवारी निकाल येणार असल्याचे जाहीर होताच पोलिसांनी अयोध्येतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी शुक्रवारी रात्रीच करून ठेवावी आणि शनिवारी शक्यतो घरातून बाहेर पडू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

शिवसेनेवर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोपः उद्धव ठाकरे

कार्तिकी पौर्णिमेच्या उत्सवानिमित्त सध्या अयोध्येमध्ये अनेक भाविक दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अयोध्येमध्ये सध्या लाखो भाविक आहेत. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालय या प्रकरणातील निकाल देणार असल्यामुळे पोलिसांनी जास्त खबरदारी घेतली आहे. 

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणात शनिवारी सकाळी निकाल येणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर लोकांनी लगेचच दुकांनामध्ये जाऊन आवश्यक घरगुती वस्तुंची खरेदी केल्याचे एक स्थानिक दुकानदार उत्तमचंद यांनी सांगितले. 

'बाळासाहेबच म्हणाले होते, ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री'

६ डिसेंबर १९९२ ला अयोध्येत जे घडले ते आता कोणलाच पुन्हा नको आहे. त्यामुळे शनिवारी अयोध्येत नक्कीच शांतता राहिल, असे अब्बास कुरेशी या स्थानिक नागरिकाने सांगितले.