पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियांका गांधींच्या सुरक्षेसाठी तैनात CRPF जवानांकडून मोठी चूक

प्रियांका गांधी

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या सुरक्षेसंदर्भात चिंतेची बाब समोर आली आहे. मागील आठवड्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांचे सुरक्षा कवच भेदून काही लोक कारसह प्रियांका गांधी यांच्या निवास परिसरात घुसल्याचे समोर आले आहे. २५ डिसेंबर रोजी हा सर्व प्रकार घडला. प्रियांका गांधी यांनी देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. प्रियांका गांधी यांच्या कार्यालयाने हा मुद्दा सीआरपीएफ विभागाच्या निदर्शनास आणून दिला आहे.  

अमित शहांनी घुसखोरांना देशाबाहेर काढण्याची दिली डेडलाईन

प्रियांका गांधी यांच्या लोधी इस्टेट परिसरातील निवासस्थानाच्या परिसरात कारमधून काही लोक आले. कारमधून आलेल्या कुटुंबियांनी प्रियांका गांधी यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा आग्रह केला. यासर्व प्रकारामुळे प्रियांका गांधी हैराण झाल्या होत्या. उत्तर प्रदेशमधील या कुटुंबियांसोबत त्यांनी सेल्फी देखील काढला. मात्र या कुटुंबियांनी भेटीसंदर्भात कोणतीही पूर्व सूचना नसल्यामुळे प्रियांका गांधींना हा सर्व प्रकार धक्कादायक असाच होता. सीआरपीएफच्या जवानांना आपली चूक लक्षात आल्यानंतर प्रियांका गांधी यांच्या निवासस्थानी असलेला बंदोबस्त वाढवण्यात आला.  

मंत्र्यांना बंगल्याचे वाटप जाहीर; या ठिकाणी राहणार हे मंत्री

प्रियांका गांधी यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सुरक्षा व्यवस्थेचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी सुरक्षिततेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने नुकतीच गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. या सर्व प्रकारानंतर प्रियांका गांधी यांच्या सुरक्षिततेसंदर्भात आणखी काही प्रश्न उपस्थित होऊ शकतात.