पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७० हटवल्यामुळे संतापलेले इम्रान खान संयुक्त राष्ट्रात जाणार

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

जम्मू-काश्मीरवर केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारताच्या या निर्णयामुळे चिडलेल्या पाकिस्तानच्या एका मंत्र्याने तर युद्धाची भाषा केली. तर आता पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रात जाण्याचा राग आळवला आहे. उल्लेखनीय म्हणजे भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्याचे कलम ३७० हटवले आहे आणि केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषितही केले आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या सुरु असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पाक संसदेने संयुक्त सत्राचे आयोजन केले होते. इम्रान खान यांनी संयुक्त सत्रात म्हटले की, आम्ही काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्रात जाणार असून आंतरराष्ट्रीय समुदायाला भाजपची वंशवादी विचारधारा भारतातील अल्पसंख्याकांवर कसा अन्याय करत आहेत, हे सांगू.

पिस्तुल रोखून अब्दुल्लांना संसदेत आणू शकत नाहीः अमित शहा

काश्मीरप्रश्नी आपण अफगाणिस्तान, इराण आणि अमेरिकेचा दौरा केला आहे. आता भारताच्या कृत्य संयुक्त राष्ट्रासमोर उपस्थित करु, असेही ते म्हणाले. 

कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानमध्येही हालचाली तीव्र झाल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयापासून ते लष्करापर्यंत सर्वांनीच यावर वक्तव्ये केली. आता भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना इस्लामाबादला बोलावले आहे. 

काँग्रेस तोंडघशी, काही आमदार कलम ३७० रद्द करण्याचा बाजूने

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Section 370 jammu and kashmir We will take the case of Kashmir to the United Nations says pakistan Prime Minister Imran Khan