पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मूमध्ये जमावबंदी हटवली; उद्यापासून शाळा होणार सुरु

जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम - 370 मधील काही तरतुदी रद्द करण्यात आल्या. जम्मू-काश्मीरपासून लडाखला वेगळे करण्यात आले. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनले. कलम- 370 रद्द करण्याचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये सादर करण्यापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली होती. कलम - 370 रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती होती. मात्र आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळे जम्मूमध्ये जमावबंदी हटवण्यात आली आहे.

  पश्चिम महाराष्ट्रात पूरामुळे 29 जणांचा मृत्यू; 6 बेपत्ता

दरम्यान, शुक्रवारी जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक मस्जिदमध्ये नमाज पठणासाठी कर्फ्यू शिथिल करण्यात आला होता. पण, श्रीनगरच्या ऐतिहासिक जामा मस्जिदमध्ये मात्र नागरिकांना एकत्र येऊन दिले नाही. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होत असल्याने शुक्रवार संध्याकाळपासून कलम- 144 अंतर्गत लागू करण्यात आलेली जमावबंदी हटवण्यात आली.

पाकिस्तानने थार एक्स्प्रेस रोखली; भारताने दिले सडेतोड उत्तर

जम्मू-काश्मीरच्या जिल्हा आयुक्त सुषमा चौहान यांनी सांगितले की, कलम 144 हटविण्यात आले आहे. तसंच जम्मू-काश्मीरमधील सर्व शाळा, महाविद्यालय शनिवारपासून सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, काश्मिरमधील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. सीआरपीएफचे डीजी राजीव राय भटनागर यांनी श्रीनगरमध्ये सीआरपीएफ जवान तैनात केलेल्या ठिकाणाची पाहणी केली. तर जम्मू-काश्मीरच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'जम्मूची परिस्थिती सामान्य आहे. तर काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील.'

दाभोलकर हत्या प्रकरण: सीबीआय समुद्रात शस्त्रास्त्र शोधणार