पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमान पाकिस्तानवरून जाणार नाही

नरेंद्र मोदी

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिश्केकला घेऊन जाणारे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून प्रवास करणार नसल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. मोदींचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाण्यास तेथील सरकारने परवानगी दिली असली, तरी हे विमान लांबच्या मार्गाने जाणार असल्याचे या निर्णयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. 

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध दहशतवादाच्या मुद्द्यावरून बिघडलेले आहेत. १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडले आहेत.

प्रतीक्षा संपली, १५ जुलैला चांद्रयान-२ झेपावणार

शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी यांना बिश्केकला घेऊन जाणारे विमान ओमान, इराण या मार्गे जाईल. हा मार्ग लांबचा असला, तरी याच मार्गाने विमान नेण्याचे निश्चित करण्यात आले आहे, असे परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

नीरव मोदीला झटका, लंडन कोर्टाने चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर २६ फेब्रुवारी रोजी हवाई हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने लढाऊ विमान धाडण्यात आली होती. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखले होते. यानंतर दोन्ही देशांनी आपापल्या हवाई हद्दीतून विरोधी देशांच्या विमानांना प्रवास करण्यास बंदी घातली होती. काही दिवसांपूर्वी तत्कालिन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना घेऊन निघालेल्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली होती.