पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... या कारणांमुळे ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस सोडली

ज्योतिरादित्य शिंदे (फोटो - राज के राज)

ज्योतिरादित्य शिंदे यांनी याच आठवड्यात काँग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या १८ वर्षांपासून काँग्रेस पक्षासोबतचा आपला प्रवास ज्योतिरादित्य शिंदे यांनी तूर्त थांबविला. यामागे नक्की कोणती कारणे होती, हे जाणून घेणे महत्त्वाचे होते. काही वर्षांपू्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीर सभांमध्ये टीका करणारे ज्योतिरादित्य शिंदे एकदम भाजपसोबत कसे गेले, त्यामागे नक्की कोणती कारणे होती, याचा केलेला उहापोह...

कोरोना इफेक्ट : शेअर बाजारात मोठी पडझड

ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जी आश्वासने दिली होती. त्यांची पूर्तता होत नव्हती. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याला हा एक महत्त्वाचा मुद्दा कारणीभूत होता.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आमदारांना राज्याच्या राजकारणात बाजूला ढकलण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरु होते.

राज्याच्या राजकारणात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा दबदबा वाढू लागला होता. जो ज्योतिरादित्य शिंदे यांना आवडत नव्हता.

नोव्हेंबर २०१८ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात चांगली कामगिरी केली. या निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस सत्तेत आली. या निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांचा दबदबा असलेल्या उत्तर मध्य प्रदेशामध्ये म्हणजे ग्वाल्हेर-चंबळ खोऱ्यात काँग्रेसने चांगली कामगिरी केली होती. पण त्यानंतरही त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले नाही. त्यामुळे ते नाराज होते. 

कोरोनाबाधितांची नावे उघड केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आमदाराला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. पण हे आश्वासनही पूर्ण करण्यात आले नाही.

राज्याच्या मंत्रिमंडळात ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असलेल्या केवळ ७ जणांना मंत्रिपद देण्यात आले. उर्वरित सर्व मंत्रिपदे कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्या समर्थक आमदारांना देण्यात आली. तेथील सरकारमध्ये एकूण २८ मंत्रिपदे आहेत.