पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हवा अत्यंत खराब असल्यामुळे दिल्लीत शाळांना मंगळवारपर्यंत सुटी

दिल्लीतील हवा अत्यंत खराब झाली आहे.

दिल्लीमध्ये हवा प्रदूषणाची पातळी अत्यंत गंभीर झाल्यामुळे तेथील शाळांना मंगळवार, ५ नोव्हेंबरपर्यंत सुटी देण्यात आली आहे. दिल्लीमधील हवा अत्यंत खराब असल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने तिथे आरोग्यविषयक आणीबाणीच जाहीर केली आहे. दिल्लीतील हवेत विषारी वायूचा थर असल्याचे प्रदूषण मंडळाने म्हटले आहे. 

महायुतीचे नेते मुंबई दरबारात, शरद पवार शेतकऱ्यांच्या दारात

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दिल्ली आणि आजूबाजूच्या भागात जाळण्यात येणाऱ्या घटकांमुळे तेथील प्रदूषणाची पातळी गंभीर झाली आहे. त्यामुळेच सरकारने दिल्लीमध्ये ५ नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुटी जाहीर केली आहे.

Whatsapp हेरगिरीची व्याप्ती मोठी, प्रफुल्ल पटेल यांचा मोबाईलही लक्ष्य

या मौसमात पहिल्यांदाच दिल्लीतील हवेची स्थिती इतकी गंभीर झाली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता एअर क्वालिटी इंडेक्स ४५९ इतका होता. जानेवारी २०१९ मध्ये दिल्लीत अशीच स्थिती निर्माण झाली होती. दिल्लीतील हवा अत्यंत खराब असल्यामुळे त्यांचे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात. लहान मुलांची या काळात विशेष काळजी घेतली जावी, असे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Schools in Delhi to be shut till November 5 as pollution level reaches severe plus category