पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चार महिन्यांचे बाळ आंदोलनात सहभागी झाले होते का? : सर्वोच्च न्यायालय

शाहिन बाग आंदोलन

दिल्लीतील शाहिन बाग येथे सुरु असलेल्या आंदोलनात चार महिन्याच्या चिमुकल्याचा नाहक बळी गेल्याची घटना घडली होती..  या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला याबाबत नोटीस पाठवली आहे. चार महिन्याचे बाळ आंदोलनात सहभागी झाले होते का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे.     

 

 

चीनकडून मोदींची प्रशंसा, 'कोरोनो'शी लढण्यासाठी दाखवली मदतीची तयारी

शाहिन बाग येथील आंदोलनात नवजात बालक मोहम्मद जहान याचा मृत्यू झाला होता. मोहम्मद जहान याची आई दररोज त्याला आंदोलन स्थळी घेऊन जात होती. दिल्लीतील थंडीमुळे ३० जानेवारीला बालकाने आपला जीव गमावला होता. यापार्श्वभूमीवर मुंबईतील १२ वर्षीय राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या झेन सदावर्ते या मुलीने सर्वोच्च न्यायालयास पत्र लिहिले होते. या पत्राच्या माध्यमातून तिने आंदोलनादरम्यान नवजात बालकांचा नाहक बळी जात असल्याचा उल्लेख करत हे रोखण्याचे आवाहन केले होते. आंदोलनामध्ये लहान बालकांना घेऊन जाण्यास बंदी घालीवी, अशी मागणी झेन दावर्ते या मुलीने केली होती.  

हिंगणघाट पीडितेच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

यासंदर्भात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी शाहिन बागमधील आंदोलन करणाऱ्या काही महिलांच्यावतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी शाळेतून मुले रडत घरी येतात असा युक्तीवाद केला. शाळेमध्ये मुलांना दहशतवादी संबोधले जाते, त्यामुळे हा प्रकार घडतो असेही वकिलांनी सांगितले.  न्यायाधीश बोबडे म्हणाले की, यावेळी एनआरसी, एनपीए आणि सीएएवरुन एखाद्या मुलाला पाकिस्तानी म्हणून चिडववले जाते यावर ही सुनावणी होत नाही. त्यामुळे या विषयावर कोणतीही चर्चा करु नये. आम्ही कोणाचाही आवाज दाबत नाही. आंदोलनात बालाकाचा मृत्यू झाला ही घटना दुर्देवी आहे. सर्वोच्च न्यायालयासाठी हीच घटना केंद्रस्थानी आहे. यासंदर्भात केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस पाठवण्यात आले असून आठवड्याच्या आता यावर स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.  सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी ही १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:SC takes suo motu cognisance of death of infant at home after parents had participated at Shaheen Bagh protest against CAA