पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धनंजय मुंडेंना दिलासा; गुन्हा दाखल करण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती मिळाली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे नियोजित जगमित्र शुगर मिलसाठी चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. ही जमीन ही देवस्थानची असल्याचा दावा वादी तर्फे करण्यात आला होता.

सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

या प्रकरणाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या औरंगाबात खंडपीठाने धनंजय मुंडे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरुद्ध धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली त्या ठिकाणी या प्रकरणावर आज (शुक्रवार) सुनावणी होणार असताना पोलिसांनी आज पहाटेच बर्दापूर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली.

कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती- धनंजय मुंडे

या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे धनंजय मुंडे यांनी स्वागत केले असून सत्याचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

मोदींच्या शौर्याची दखल गिनीज बुकने घ्यावी, धनंजय मुंडेंचा टोला

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:SC stays Bombay HC order directing registration of an FIR against Dhananjay Munde in a case of an alleged illegal purchase of government land