पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विश्वासदर्शक ठरावावर बुधवारी पाचच्या आत मतदान घ्या - सुप्रीम कोर्ट

सर्वोच्च न्यायालय

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वाचा अंतरिम आदेश दिला. बुधवारी, २७ नोव्हेंबर रोजीच विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बुधवारी दुपारपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करा आणि पाच वाजण्याच्या आत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्या, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.

अजित पवारांची क्लीन चिट योगायोग, शंका घेऊ नका, खडसेंचा टोला

विश्वासदर्शक ठरावासाठी आणि आमदारांना शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जावी. त्याचबरोबर विश्वासदर्शक ठरावावर गुप्त मतदान न घेता खुल्या पद्धतीने मतदान घेतले जावे. या संपूर्ण प्रक्रियेचे लाईव्ह टेलिकास्ट करावे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले जावे, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. लोकशाही मूल्यांची जपणूक होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर चांगले सरकार मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे, याचा उल्लेख न्यायालयाने आपला निकाल देताना केला.

नितीन गडकरी शहाणे राजकारणी वाटत होते, शिवसेनेचा टोला

न्या. एन व्ही रमणा, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निकाल दिला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट रात्रीतून उठविणे आणि फडणवीस सरकारला तातडीने विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यायला लावण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेसाठी रविवारीही सुटीच्या दिवशी न्यायालयाचे कामकाज सुरू होते. रविवार आणि सोमवार दोन्ही दिवस न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सविस्तरपणे ऐकून घेतला. त्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.