पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिदंबरम यांना दिलासा, तिहार तुरुंगात जाणे तूर्त टळले

पी चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी काहीसा दिलासा दिला. पी. चिदंबरम यांना सीबीआय कोठडीतच ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे तूर्ततरी चिदंबरम यांची रवानगी दिल्लीतील तिहार तुरुंगात होणार नाही. केंद्र सरकारचे अधिवक्ता तुषार मेहता यांनी सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करताना चिदंबरम यांची चौकशी सीबीआयकडून पूर्ण झाली आहे. त्यांना तूर्ततरी कोणतेही प्रश्न विचारायचे नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना रोहित पवार यांचे सडेतोड उत्तर

युक्तिवाद करताना तुषार मेहता म्हणाले, आम्हाला आता चिदंबरम यांची चौकशी करायची नाही. त्यामुळे न्यायालयाने आपला निर्णय घ्यावा. केवळ एखाद्या व्यक्तीला न्यायालयीन कोठडीत जायचे नाही, म्हणून न्यायालयाने एखादा निर्णय का द्यावा, असाही प्रश्न यावेळी तुषार मेहता यांनी उपस्थित केला.

न्या. आर. बानूमती यांच्या नेतृत्त्वाखालील दोन सदस्यीय खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने चिदंबरम यांना ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले. चिंदबरम यांच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद करताना कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी आम्ही पाच सप्टेंबरपर्यंत उच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहू. तोपर्यंत आम्ही जामिनासाठी अर्ज करणार नाही, असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. न्यायालयाने निकाल देताना याचाही विचार केला.

T-20 :विराट-रोहितअगोदर २००० धावांचा टप्पा गाठणाऱ्या मितालीची निवृत्ती

आयएनएक्स मीडिया प्रकरणात उच्च न्यायालयाने चिदंबरम यांच्या अटकेला दिलेले संरक्षण गेल्या महिन्यात काढून घेतले. त्यानंतर सीबीआयने त्यांना दिल्लीमध्ये अटक केली.