पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ममता बॅनर्जींचे आक्षेपार्ह छायाचित्र शेअर करणाऱ्या भाजप कार्यकर्तीला जामीन

प्रियांका शर्मा (ANI)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आक्षेपार्ह छायाचित्र शेअर केल्यामुळे अटकेत असलेल्या भाजप कार्यकर्त्या प्रियांका शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. न्यायालयाने सुरुवातीला प्रियांका यांना ममता बॅनर्जी यांची लेखी माफी मागण्याची अट ठेवली होती. मात्र, न्यायालयाने नंतर शर्मा यांचे वकील कौल यांना पुन्हा बोलावले आणि आपल्या आदेशात बदल करत लेखी माफी मागण्याची अट रद्द केली आणि शर्मा यांना त्वरीत मुक्त करण्याचे निर्देश दिले. 

ममतांचा RSS-BJP वर गंभीर आरोप

सर्वोच्च न्यायालयाच्या सुटीतील खंडपीठाने सुनावणी दरम्यान सुरुवातीला जामीन मिळताच शर्मा यांनी त्वरीत ममता बॅनर्जींची माफी मागावी असे निर्देश वकील कौल यांना दिले होते. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयावर प्रियांका यांच्या कुटुंबीयाने आनंद व्यक्त केला आहे. प्रियांका या ममता बॅनर्जी यांचे आक्षेपार्ह छायाचित्र शेअर केल्याप्रकरणी १० मे पासून कारागृहात होत्या. 

दीदी, तुमची थप्पड माझ्यासाठी आशीर्वाद - नरेंद्र मोदी

भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्या प्रियांका यांनी ममता बॅनर्जी यांचे फोटोशॉप केलेले एक छायाचित्र शेअर केले होते. या छायाचित्रात प्रियांका चोप्राच्या मेट गाला पोशाखात ममता बॅनर्जी यांना दाखवले होते. या छायाचित्रावर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांची तीव्र प्रतिक्रिया आली होती. कोलकाता पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर प्रियांका यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 

ममताजींनी पातळी ओलांडली, सुषमा स्वराज यांचे ट्विट

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:SC grants bail to BJP activist Priyanka Sharma waives apology condition for objectionable picture of CM Mamata Banerjee