पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया बलात्कार प्रकरण : दोषी पवनकुमारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सर्वोच्च न्यायालय

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवनकुमार गुप्ता याची फाशीच्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. गुन्हा घडला त्यावेळी आपण अल्पवयीन होतो, असा युक्तिवाद पवनकुमार गुप्ता याच्या वकिलांनी केला. पण सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळला आणि त्याला सुनावलेली शिक्षा कायम ठेवली. निर्भया बलात्कार प्रकरणात एकूण ४ दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध डेथ वॉरंट जारी करण्यात आले असून, येत्या १ फेब्रुवारीला या चौघांना फाशी देण्यात येणार आहे.

फसवून २ लाखांचे सोन्याचे दागिने चोरले आणि तुरुंगात जावे लागले...

न्या. आर. बानूमथी यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठामध्ये या प्रकरणी सुनावणी झाली. १६ डिसेंबर २०१२ मध्ये जेव्हा ही घटना घडली. त्यावेळी आपण अल्पवयीन होतो, असा युक्तिवाद पवनकुमार गुप्ता याने न्यायालयात केला. फाशीची शिक्षा रद्द केली जावी, अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली. पण न्यायालयाने ती फेटाळली. पवन गुप्ताची जन्मतारीख ८ ऑक्टोबर १९९६ होती. पण दिल्ली पोलिसांनी मोठा कट रचून त्याच्या जन्मतारखेत फेरफार केल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला. पण न्यायालयाने तो फेटाळला आणि त्याची शिक्षा कायम ठेवली.

VIDEO:जेव्हा तुझा बाप..,सीएएवरुन जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य

चारही दोषींना १ फेब्रुवारीला दिल्लीतील कारागृहात फाशी देण्यात येईल. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.