पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियांकांना लगेच का नाही सोडले, सुप्रीम कोर्टने बंगाल सरकारला फटकारले

 प्रियांका शर्मा (ANI)

भाजप कार्यकर्त्या प्रियांका शर्मा यांना तात्काळ मुक्त न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुटीच्या न्यायालयाने मंगळवारी (दि.१५) प्रियांका यांना सोडण्याचे आदेश दिले होते. औपचारिकता पूर्ण करण्यासाठी वेळ लागतो. यासाठी आज (बुधवार) सकाळी ९.४० वाजता प्रियांका यांना सोडण्यात आल्याचे बंगाल सरकारने न्यायालयाने सांगितले. मात्र, आम्ही आदेश दिल्यानंतरही प्रियांका यांना का सोडण्यात आले नाही, असा सवाल न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आक्षेपार्ह छायाचित्र शेअर केल्यामुळे प्रियांका यांना अटक करण्यात आली होती.

ममता बॅनर्जींचे आक्षेपार्ह छायाचित्र शेअर करणाऱ्या भाजप कार्यकर्तीला जामीन

प्रियांका शर्मा यांना मुक्त न केल्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त करत म्हटले की, जामीन दिल्यानंतरही प्रियांका यांना त्वरीत का मुक्त करण्यात आले नाही ? जर त्यांना तात्काळ मुक्त केले नसेल तर तो न्यायालयाचा अवमान समजला जाईल. 

यावर प्रियांका यांच्या वकिलांनीही त्यांना अजून सोडण्यात आले नसल्याचे सांगितले. उत्तरादाखल बंगाल सरकारने प्रियांका यांना सकाळी ९.४० वाजता सोडल्याचे म्हटले. न्यायालयानेही प्रियांका यांना तात्काळ सोडले नाहीतर अवमानना नोटीस दिली जाईल, असे म्हटले. 

न्यायालयाने यावर प्रियांकाच्या अटकेवरही प्रश्न उपस्थितीत केला. मनमानी पद्धतीने अटक केल्यासारखे वाटत असल्याचे मत त्यांनी नोंदवले. न्यायालयाने मंगळवारच्या आपल्या आदेशात बदल करत जामिनानंतर ममता बॅनर्जी यांची लेखी माफी मागण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, प्रियांका यांच्या कुटुंबीयांनी प्रियांका यांना अजून सोडण्यात आले नसल्याची तक्रार केली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:SC censures West Bengal govt over delay in the release of BJP worker Priyanka Sharma mamata Banerjee meme