पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सौदी राजपुत्रानं अ‍ॅमेझॉनच्या जेफ बेझॉसचा फोन हॅक केल्याचा आरोप

 सौदी राजपुत्र मोहम्मद बीन सलमान

सौदी राजपुत्रानं अ‍ॅमेझॉनच्या जेफ बेझॉसचा  फोन हॅक केल्याचा आरोप सौदी अरेबियानं बुधवारी फेटाळून लावला आहे. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक असलेल्या जेफ बेझॉस यांचा फोन सौदी राजपुत्रानं हॅक करून त्यातील अत्यंत महत्त्वाची माहिती हाताळली अशा स्वरुपाच्या बातम्या माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर सौदीनं उत्तर दिलं आहे. 

जेफ बेझॉस यांना २०१८ मध्ये एक मेसेज आला होता. हा मेसेज सौदी राजपुत्र मोहम्मद बीन सलमान यांच्या खासगी व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावरून  जेफ यांना पाठवण्यात आला होता. मात्र हा मेसेज नसून ती   malicious file होती. त्याद्वारे तासाभरात जेफ यांच्या मोबाइलमधली महत्त्वाची माहिती मोहम्मद बीन सलमान यांनी मिळवली असा आरोप करण्यात आला आहे. 

मनसे हिंदुत्वाची कास धरणार?, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

जेफ यांचा फोन हॅक होण्यामागे सौदीचा हात असल्याची केवळ अफवा आहे. या आरोपांमागचं सत्य बाहेर यावं यासाठी आम्ही सखोल चौकशी करणार आहोत. चौकशीअंतर्गत सत्य बाहेर आल्यानंतर आम्ही योग्य पुरावा देऊ अशी माहिती सौदीतल्या अमेरिकन दूतावासाकडून जाहीर करण्यात आली आहे. 

 गेल्या वर्षापासून सौदी अरेबिया आणि अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझॉस यांच्या नात्यात कुटुता आली आहे.  सौदी अरेबियन स्तंभलेखक आणि पत्रकार  जमाल यांच्या खूनानंतर सौदी सरकारचे आणि जेफ यांचे संबंध बिघडले होते. जेफ यांचा फोन हॅक करून सौदीनं जेफ डेट करत असलेल्या माजी पत्रकार महिला आणि त्यांच्या खासगी संभाषणाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असा दावा बेझॉस यांच्या सुरक्षा प्रमुखांनी केला आहे. 

बळजबरीने समलिंगी संबंध ठेवल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, १४ जण अटकेत