पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सौदी अरेबियामध्ये भीषण अपघात, ३५ जणांचा मृत्यू

अपघातग्रस्त बस

मदिना शहरात एक बस आणि एका अवजड वाहनामध्ये झालेल्या धडकेत ३५ विदेशी भाविकांचा मृत्यू तर चार जण जखमी झाले आहेत. सौदीच्या सरकारी माध्यमांनी गुरुवारी ही माहिती दिली. मदिना पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, सौदी अरेबियाच्या पश्चिम शहरात बुधवारी हा अपघात झाला. यामध्ये एक खासगी चार्टर्ड बस आणि एका अवजड वाहनामध्ये टक्कर झाली.

अपघातग्रस्त लोक हे अरब आणि आशियाई भाविक होते. जखमींना अल हमना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी याचा तपास सुरु केला आहे.