पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आवडत्या पक्षाला आईने मत दिले नाही म्हणून त्याने EVM फोडले

आईने आवडत्या पक्षाला मत न दिल्याने मुलाने ईव्हीएम फोडले (ANI)

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज (सोमवार) सुरु आहे. बिहारमध्येही आज निवडणूक होत आहे. दरम्यान, येथील सारण लोकसभा मतदारसंघातील छपरा येथे आईने आवडत्या पक्षाला मत न दिल्याने तो आधी आईवर भडकला आणि नंतर त्याने ईव्हीएमच फोडले.

हा प्रकार सोनपूर विधानसभा मतदारसंघातील यमुनासिंह महाविद्यालयात घडला. महदल्ली चक येथील वॉर्ड सदस्याचा मुलगा रंजीत हाजरा याने सांगितलेल्या उमेदवारास मत न दिल्याने बुथ जवळच पहिल्यांदा त्याने आपल्या आईवर राग काढला. त्यानंतर तो १३१ क्रमांकाच्या बुथवर गेला आणि त्याने ईव्हीएम फोडले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर दुसरे ईव्हीएम बसवण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा मतदान सुरु झाले. 

या मतदारसंघात १२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. राजीव प्रताप रुडी आणि महाआघाडीचे उमेदवार आणि लालूप्रसाद यादव यांचे नातेवाईक चंद्रिका राय यांच्यात थेट लढत होत आहे. सध्या तरी दोघांचे पारडे जड आहे. येथे जातीय समीकरणांवरच मतदान होत असले तरी रुडी यांना आपल्या कार्यावर भरवसा आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Saran Lok Sabha constituency mother did not vote for favorite candidate son anger and broken EVM at chhapra