पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शारदा घोटाळा: IPS राजीव कुमार यांच्याविरोधात लुकआउट नोटीस

राजीव कुमार

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना देशातून बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केले आहे. याशिवाय सीबीआयकडून शारदा घोटाळा प्रकरणातील चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यासंदर्भातील हालचालींनाही आता वेग आला आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने कुमार यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी खबरदारी म्हणून सर्व विमानतळ आणि संबधिक अधिकाऱ्यांन सूचना जारी केली आहे. २५ हजार कोटी रुपये शारदा घोटाळा प्रकरणात १९८९ बॅचचे आयपीएस अधिकारी कुमार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सीबीआयकडून सुरु आहेत. 

दाभोलकर हत्येप्रकरणी 'सनातन'चे पुनाळेकर यांच्यासह दोघांना अटक

यापूर्वी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाला म्हटले होते की, चौकशी दरम्यान ते सहकार्य करत नाहीत. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे. कुमार एसआयटी चौकशीचे प्रभारी होते. त्यांनी आरोपींकडून जप्त केलेले मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्ती मुक्त करण्याची परवानगी दिली होती. यामध्ये घोट्याळ्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांशी सलंग्नित महत्त्वपूर्ण माहिती होती, असे सीबीआयचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टात बाजू मांडताना सांगितले होते.