पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून देसी क्वीन सपना चौधरी भाजपमध्ये आली

सपना चौधरी

हरयाणातील लोकप्रिय नृत्य अदाकार सपना चौधरी हिने भाजपमध्ये प्रवेश घेऊन जवळपास चार महिने उलटले आहेत. मंगळवारी एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना तिने भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कारण सांगितले. एवढेच नाही तर काँग्रेसपक्ष स्वार्थी असल्याची टीकाही तिने केली.

राजकीय कार्यक्रमात पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सपना चौधरीला पूर्वी तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा विचार केला होता का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली की, मी एकदा काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना भेटण्यासाठी गेले होते. ही भेट काँग्रेस  प्रवेशाच्या संदर्भात बिलकूल नव्हती. काँग्रेस पक्ष फक्त आपल्याविषयी विचार करणारा पक्ष आहे, असेही ती म्हणाली.  

शिवस्मारकात भाजपने घोटाळा केला, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वामुळेच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे सांगताना तिने मोदींसह भाजपच्या कामाचे कौतुक केले. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशाच्या महिलांसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. सरकार चांगल्या योजना लागू केल्या. शौचालयसारख्या महत्त्वाचा प्रश्वावर सरकारने उल्लेखनिय काम केले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर समाधानी आहे, असेही ती म्हणाली.

उल्लेखनिय आहे की, सपना चौधरी हिने मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सपना चौधरीने भाजपचे दिल्लीतील उमेदवार मनोज तिवारी यांचा प्रचार केला होता.  

शरद पवारांवरील प्रश्नावर उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी