पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोणीही आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवू नका; संजय राऊतांचा मोदींना टोला

संजय राऊत

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत आमच्या मनात काही शंका आहेत. त्या आम्ही राज्यसभेत मांडू. त्याबाबत आम्हाला योग्य उत्तर मिळाले नाही तर आमचा निर्णय वेगळा असू शकतो, असे मत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, कोणीही आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवू नका, असा टोला संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.

शिवसेनेकडे गृह, नगरविकास; राष्ट्रवादीकडे अर्थ, गृहनिर्माण, घोषणा लवकरच

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. या विधेयकाला काँग्रेसने विरोध केला आहे. तर शिवसेनेने आपली भूमिका बदलली आहे. नागरिकत्व विधेयकाला विरोध करणारे पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय मंडळाच्या बैठकीत केली आहे. याला संजय राऊत यांनी उत्तर देताना असे म्हटले आहे की, 'कोणाकडून राष्ट्रभक्तीचे मार्गदर्शन घेण्याची आम्हाला गरज नाही. या देशाचा प्रत्येक नागरिक राष्ट्रभक्त आहे.'

बॅनर्जी यांनी खास भारतीय पोशाखात स्वीकारला नोबेल

दरम्यान, व्होटबँकचे राजकारण करु नका, ते योग्य नाही. पुन्हा हिंदू-मुस्लिम फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसंच, शिवसेना कधीच कोणाच्या दबावाखाली येऊन राजकारण करत नाही. जे आमच्या मनात आहे तेच तोंडातून निघते, असे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, या विधेयकाबाबत आमचे काही प्रश्न आहेत. सरकारने या प्रश्नांचे निरसन करावे. या चर्चेनंतर शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करेल, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

'मनोहर जोशींनी केलेले विधान ही त्यांची वैयक्तिक भूमिका'