पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राम मंदिराच्या मुद्यावर राऊत म्हणाले, मोदीजीच आमचे सुप्रीम कोर्ट

संजय राऊत

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे आमच्यासाठी मोदीजीच सुप्रीम कोर्ट आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, " राम मंदिर उभारण्याचा शुभ मुहूर्त जवळ आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली आयोध्या येथे राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होईल. देशातील जनतेने मोदींना बहुमतात निवडले आहे. त्यामुळे तेच आमचे सुप्रीम कोर्ट आहेत."

नवज्योतसिंग सिद्धू यांनी राहुल गांधींची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण

आयएएनएसच्या वृत्तानुसार, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आयोध्येमध्ये कोणत्याही परिस्थितीत राम मंदिर उभारणारच असे म्हटले आहे. भाजप पुन्हा-पुन्हा राम मंदिराच्या मुद्यावरुन मतदारांसमोर जाऊ शकत नाही, असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे १६ जून रोजी सेनेच्या सर्व खासदारांसह अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहेत.

देशात २०४७ पर्यंत भाजपच सत्तेत राहिल - राम माधव

याशिवाय त्यांनी उप-सभापती पदासंदर्भातही भाष्य केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) भाजपनंतर शिवसेना हाच सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे उप-सभापती पदाची मागणी नाही तर तो आमचा अधिकार असल्याचे ते म्हणाले.