पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाउनमध्ये मद्य विक्रीला परवानगी नाहीच, गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण

लॉकडाउनमध्ये मद्य विक्रीची दुकाने बंदच राहणार

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाउनच्या कालावधीत ग्रामीण भागात थोड्याप्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक छोटी मोठी दुकाने खुली होण्याचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान लॉकडाउनच्या कालावधीत मद्य विक्रीची दुकाने खुली करावी, अशी मागणी होत होती. केंद्र सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लॉकडाउनच्या काळात मद्य विक्रीच्या दुकानांना कोणतीही मुभा मिळणार नाही, असे गृहमंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.  

कोरोनाच्या मुद्यावरुन चीनची कोंडी करण्यासाठी अमेरिकेकडून मोर्चेबांधणी

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्याने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, लॉकडाउनच्या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागातील एकल व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात शॉपिंग मॉल व्यतिरिक्त अन्य दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हॉटस्पॉटची ठिकाणांशिवाय शहरी भागातील दुकाने उघडण्यासही मुभा देण्यात आली आहे. मात्र मद्य विक्रीची दुकानेही बंदच ठेवण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. ई कॉमर्स कंपन्यांनी आवश्यक त्या वस्तूंचीच विक्री करावी, असेही नव्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.  लॉकडाउनमध्ये कोणती दुकाने सुरु राहणार आणि कोणत्या दुकानांची शटर बंद राहणार याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने शनिवारी स्पष्टीकरण दिले.

'केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना देय महागाई भत्ता रोखण्याची गरज नव्हती'

लॉकडाउनच्या काळात दुकाने उघडण्याची शिथिलता दिली असली तरी मार्केट परिसरात वर्दळीच्या ठिकाणी असणारी दुकाने बंदच ठेवावी, असेही सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारने काही प्रमाणात दुकाने उघडण्यास शिथिलता दिली असली तरी दिल्ली सरकारने यासंदर्भातील निर्णय २७ एप्रिलला घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमाचे दिल्ली सरकार पालन करणार नाही. राजधानी दिल्लीतील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेऊ

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sale of liquor remains prohibited in Lockdown Govt clarifies on order allowing reopening of shops amid coronavirus outbreak