पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना: पंतप्रधान, कॅबिनेट मंत्र्यांसह खासदारांच्या पगारात ३० टक्के कपात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सोमवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि खासदारांचे पगार ३० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा पगार एका महिन्यासाठी नाही तर एक वर्षासाठी कपात करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. 

देशातील काही भागात कोरोना तिसऱ्या टप्प्यातः एम्स संचालक

प्रकाश जावडेकरांनी सांगितले की, 'केंद्रीय मंत्रिमंडळाने संसद अधिनियम १९५४ नुसार सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतनांमध्ये कपात करण्याच्या अध्यादेशास मंजुरी दिली आहे. १ एप्रिल २०२० पासून भत्ता आणि निवृत्ती वेतनात एका वर्षासाठी ३० टक्के कपात केली जाईल.' तसंच, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपालांनी स्वेच्छेने सामाजिक जबाबदारी म्हणून वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.  हे पैसे एकत्रित फंडाकडे जातील, असे देखील प्रकाश जावडेकरांनी सांगितले. 

दिलासादायक! इस्लामपूरचे पहिले ४ रुग्ण कोरोनामुक्त

दरम्यान, भारतामध्ये कोरोना विषाणूने आतापर्यंत १०९ नागरिकांचा बळी घेतला आहे. तर संपूर्ण देशात आतापर्यंत ४०६७ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर रविवारी संध्याकाळपर्यंत देशात आणखी ४९० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आणखी २६ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. 

कोविड-१९ : केजरीवाल सरकारवर 'गंभीर' आरोप