पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून कुणाल कामरा यांनी इंडिगोच्या वैमानिकाला केला सलाम!

कुणाल कामरा

एकपात्री विनोदी कलाकार (स्टॅंडअप कॉमेडियन) कुणाल कामरा या आठवड्यात विशेष चर्चेत आले आहेत. इंडिगोच्या विमानात प्रसिद्ध टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी यांना काही प्रश्न विचारून त्यांच्याशी अयोग्य वर्तन केल्यावरून इंडिगोने कामरा यांच्यावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली. या घटनेनंतर एअर इंडिया, गोएअर आणि स्पाईसजेटनेही कुणाल कामरावर बंदी घातली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कुणाल कामरा यांनी आता इंडिगोच्या वैमानिकाचे खास ट्विट करून आभार मानले आहेत. त्याचे कारणही विशेष असेच आहे.

कोरोना विषाणू : ... म्हणून गूगलने आपल्या सर्च रिझल्टमध्ये केला बदल

इंडिगोच्या ज्या मुंबई-लखनऊ विमानामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. त्या विमानाचे वैमानिक होते रोहित मतेटी. कुणाल कामरा यांच्यावर सहा महिन्यांसाठी इंडिगोने बंदी घातल्यावर रोहित मतेटी यांनी थेट आपल्या व्यवस्थापनाला एक पत्र लिहिले. या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्या दिवशी विमानात कुणाल कामरा यांनी केलेले वर्तन असभ्य या श्रेणीत मोडणारे नक्कीच नव्हते. त्यांनी मर्यादा काही प्रमाणात ओलांडली हे खरे आहे. पण ते असभ्य वागले नाहीत. त्याचबरोबर या प्रकरणी कुणाल कामरा यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही केवळ सोशल मीडियातील पोस्टच्या आधारावर करण्यात आली. वास्तविक विमानातील प्रवाशावर कारवाई करण्याआधी संबंधित वैमानिकांशी सल्लामसलत केली जाते. पण या प्रकरणात माझ्याशी काहीच चर्चा करण्यात आली नाही. माझ्या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदाच असा प्रकार पाहिला, असेही त्यांनी व्यवस्थापनाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

विरोधाच्या नावाखालील हिंसाचार देशालाच कमकुवत करतो: राष्ट्रपती

रोहित मतेटी यांच्या याच पत्रामुळे कुणाल कामरा यांनी शुक्रवारी दुपारी खास ट्विट करून त्यांचे आभार मानले आहेत. आपली बाजू निर्भीडपणे मांडल्यामुळे कुणाल कामरा यांनी रोहित मतेटी यांचे आभार मानत त्यांना सलाम केला.