पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साक्षी आणि अजितेश यांना एकत्र राहण्याचे कोर्टाचे आदेश, सुरक्षाही पुरविली

साक्षी आणि अजितेश

दलित मुलाशी लग्न केल्यामुळे संपू्र्ण देशात चर्चेत आलेली उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी आणि तिचा नवरा अजितेश यांना एकत्र राहण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर त्यांना सुरक्षा पुरविण्याचे निर्देशही न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना दिले आहेत. सोमवारी सकाळी हे दाम्पत्य उच्च न्यायालयात आले होते. त्यावेळी काही जणांकडून अजितेश याला धक्काबुक्कीही करण्यात आली. 

'मुस्लिमांमधील ५० पत्नी, १०५० अपत्ये ही प्राण्यासारखीच प्रवृत्ती'

दरम्यान, न्यायालयात सुरक्षा मागण्यासाठी आलेल्या आणखी एका दाम्पत्याचे सोमवारी सकाळी अपहरण करण्यात आले. त्यावेळी साक्षी आणि अजितेश यांचेच अपहरण झाल्याची चर्चा पसरली होती. पण नंतर अपहरण झालेले दाम्पत्य मुरादाबादचे असल्याचे स्पष्ट झाले. साक्षी आणि अजितेश हे दोघेही सुरक्षित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

साक्षी आणि अजितेश यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्याला सुरक्षा पुरविली जावी, अशी मागणी केली होती. उच्च न्यायालयाने त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर त्यांना सुरक्षा पुरविण्याचे निर्देश पोलिसांना दिले. त्याचबरोबर दोघांनी एकत्रच राहावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

ICC World Cup: जाणून घ्या पुढचा विश्वचषक कधी, कुठे खेळवला जाणार

सुनावणीसाठी साक्षी आणि अजितेश न्यायालयात आले, त्यावेळी तिथे मोठी गर्दी होती. यावेळी काही जणांकडून अजितेशविरोधात घोषणाही देण्यात आल्या, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अजितेश याला काही जणांकडून धक्काबुक्कीही करण्यात आली. सुनावणीनंतर दोघांनाही न्यायालयाच्या सचिवांच्या कार्यालयातच बसवून ठेवण्यात आले आहे. त्यांना पूर्ण सुरक्षेत न्यायालयातून बाहेर नेण्यात येईल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sakshi and ajitesh petition allahabad high court ordered both of them live together know the whole case