पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद एन्काऊंटर: हुज्जत घालणाऱ्या महिला पत्रकाराला सायनाने सुनावले

सायना नेहवाल आणि पत्रकार अन्ना वेट्टीकाड

हैदराबादमधील पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टर तरुणीचा बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या आरोपींचा तेलंगणा पोलिसांनी एन्काउंटरमध्ये खात्मा केला. पोलिसांच्या या भूमिकेनंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. जनसामान्यांपासून कला आणि क्रीडा क्षेत्रातून पोलिसांच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. 

बंदूक हिसकावून आरोपीने पहिली गोळी झाडली : पोलीस आयुक्त

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवालनेही तेलंगणा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले होते. तिच्या या भूमिकेवर स्त्रीवादी लेखक आणि पत्रकार अन्ना एमएम वेट्टीकाड यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सायनानेही तिला प्रत्त्युतर दिले आहे. आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत तुझे विचार आणि कायदा बलात्कारी मानसिकता बदलू शकत नाहीत, अशा शब्दांत सायनाने प्रतिक्रिया दिली आहे.  

हैदराबाद एन्काऊंटर: मानवाधिकार आयोगाने दिले चौकशीचे आदेश

पीडितेसंदर्भात घडलेला प्रकार हा भयावह आणि कल्पनेपलिकडचा होता. याप्रकरणातील आरोपींना गोळ्या घातल्या हे योग्यच आहे. जर पीडितेकडे बंदूक असती तर तिनेही असेच केले असते, अशा आशयाचे ट्विट करत सायना नेहवालने अन्ना एमएम वेट्टीकाड या महिला पत्रकार आणि लेखिकेला उत्तर दिले आहे. एन्काउंटरचे स्वागत केल्यानंतर अन्ना एमएम वेट्टीकाड यांनी सायना नेहवालकडून अशी अपेक्षा नव्हती, असे म्हटले होते. सायना नेहवाल हे लोकप्रिय आणि आयडल व्यक्तिमत्व आहे. संवेदनशील मुद्यावर व्यक्त होण्यापूर्वी या गोष्टीचा अभ्यास करावा, असा सल्ला त्यांनी सायनाला दिला होता. 

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरण: पोलिसांच्या कामगिरीचे होतेय कौतुक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Saina Nehwal Gives Strong Reply to a Journalist on Hyderabad Encounter Says Victim Would Have Also Shot the Rapists