पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साहित्य अकादामी विजेते डॉ. नंजुंदन यांचा मृत्यू, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला

साहित्य अकादामी विजेते डॉ. नंजुंदन यांचा मृत्यू

साहित्य अकादमी विजेते आणि प्राख्यात भाषांतकार डॉ. नंजुंदन, यांचा मृतदेह शनिवारी कुजलेल्या अवस्थेत   त्यांच्या राहत्या घरात पोलिसांना आढळला आहे. 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५८ वर्षीय नंजुंदन  यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं चार दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असावा, नगादेवनहल्ली येथील राहत्या घरी शनिवारी पोलिसांना त्यांचा मृतदेह आढळला. डॉक्टर नंजुंदन यांनी अनेक पुस्तकांचं कन्नडमधून तामिळमध्ये भाषांतर केलं आहे.  त्यात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यूआर अनंतमूर्ति यांच्या 'भव' आणि  'अवस्थे' या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांना २०१२ साली  'अक्का' या तामिळमध्ये भाषांतरीत केलेल्या लघुकथासंग्रहासाठी साहित्य अकादमी  पुरस्कार मिळाला होता. 

अमिताभ बच्चन राष्ट्रीय चित्रपट सोहळ्याला राहणार अनुपस्थित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंजुंदन  हे बंगळुरु विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत होते. गेले काही दिवस ते विद्यापीठात आले नव्हते. नंजुंदन यांचे   सहाय्यक शोध घेत त्यांच्या घरी पोहोचले, मात्र नंजुंदन  यांचं घर आतून बंद असून त्यातून दुर्गंधी येत होती. सहाय्यकाने नंजुंदन यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. ते चेन्नईत वास्तव्यास होते. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी  नंजुंदन यांचा दरवाजा तोडला, तेव्हा नंजुंदन यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांना आढळला. 

भारतीय असल्याचा पुरावा मागण्याचा अधिकार कोणालाच नाही : प्रियांका गांधी

नंजुंदन यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली आहे.